वाढत्या उष्णतेचा फायदा घेत तुम्ही करू शकता लाखोंची कमाई
ऊसाचा रस:-
ऊसाचा रस हे उन्हाळ्यातील पेय असलं तरी, हल्ली कोणत्याही सिझनमध्ये हमखास मिळते. या रसाचा चाहतावर्गही भरपूर मोठा आहे. अनेक अर्थांनी बहुगुणी असलेला हा ऊसाचा रस कावीळ सारख्या आजारावर रामबाण उपाय मानला जातो.
या रसाला वेगवेगळे फ्लेवर्स दिले जातात. यात कधी आईसक्रीम टाकले जाते तर कधी लिंबू पिळून ऊसाच्या रसाला वेगळी टेस्ट दिली जाते. उन्हाळ्यात शरीरात पाणी आणि ग्लुकोजचे बॅलन्स असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. ऊसाच्या रसमुळे या दोघांचा योग्य समतोल शरीरात राहतो. लहान मुलांसाठी एनर्जी ड्रिंक म्हणून ऊसाचा रस फायदेशिर असतो. बाजारात मिळणाऱ्या कोल्ड्रींक्सपेक्षा ऊसाचा रस कधीही बेस्ट ठरतो.
प्लेन ऊसाच्या रसची टेस्टीही छान असते. मात्र यात लिंबुचा रस किंवा आले, पुदीन्याच्या रसाने देखील वेगळी टेस्ट उपलब्ध करून दिली जाते. या फ्लेवर्समुळे ऊसाचा रस टेस्टीसह हेल्दी ठरतो. लिंबू, पुदिना आणि आल्याचा रस ऊसाच्या रसात मिक्स केल्याने उन्हाचा त्रास कमी होऊन शरीरासाठी फायदेशिर ठरते.
ऊसाचा रस लाभकारक आहे. पण तो स्वच्छ आणि ताजा असावा. कारण यात साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे बॅक्टेरियाचा फटका बसतो. त्यामुळे साथीचे आजार पसरतात. बाहेर मिळणाऱ्या कोल्ड्रींक्समध्ये कार्बोनेटेड वॉटर असल्यामुळे अन्न पचत नाही, यासाठी कोल्ड्रींक्स टाळावे.

Comments
Post a Comment