वाढत्या तापमानामुळे तुम्ही करू शकतात स्वतःचे संरक्षण आणि व्यवसाय देखील
उन्हाळ्यात घाम खूप आल्याने शरीरातील साल्टस कमी होतात आणि पाणी पण कमी होते त्यासाठी जास्त पाणी पिणे आणि त्यासोबतच ज्यातून ह्या salts ची कमतरता पूर्ण होईल असे पेय जरूर प्यावे।
एकच पेय उपयोगी आहे असे म्हणता येत नाही पेय पिणे आणि सोबत पाणी पण पिणे शरीरासाठी चांगले आहे।
१ लिंबूपाणी - उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर लगेचच पाणी पिल्यास उन्हाचा फटका बसण्याचा धोखा जास्त असतो. अशावेळी थोडं थांबून लिंबूपाणी ( पाणी + साखर + चिमूटभर मीठ + लिंबाचा रस) पिल्यास उन्ह लागत नाही. मात्र लिंबूपाणी तयार केल्यावर लगेचच प्यावे, ते साठवून ठेवू नये. तसेच लिंबूपाणी गाळून घेऊन पिऊ नये.
२ कैरीचे पन्हे - उन्हाळ्यात आमच्या भागात लिंबू महाग असतात, बरेचदा मिळत सुध्दा नाहीत. तेव्हा कैरीचं पन्हं एकदम उत्तम. कैऱ्या वाफवून घेऊन, त्यातला गर काढून घेऊन, त्यात पाणी, चवीनुसार साखर, विलायची, चारोळी, खोबऱ्याचा किस घातला की मेजवानीच ठरते. याचा फायदा असा की कैऱ्या वाफवून त्यातला गर आपण काचेच्या बरणीत साठवून ठेऊ शकतो व गरजेप्रमाणे वापरू शकतो. आमच्याकडे पन्हं सर्वांना आवडत असल्याने त्याची चलती आहे.
३ जिरेपाणी - खेड्यात लिंबू मिळत नाहीत आणि कैऱ्या सुद्धा खिशाला परवडत नाहीत, अश्या वेळी उन्हापासून बचावाचा मार्ग म्हणजे जिऱ्याचं पाणी. एका भांड्यात जिरं भिजवून ठेवून गरजेनुसार त्यात पाणी घालून पिल्यास उन्ह लागत नाही.
४ ताक/ मठ्ठा - दह्यापासून बनलेले ताक / मठ्ठा हा आणखी एक रामबाण उपाय. आई अजूनही दही घुसळून त्यात थोडं पाणी व जिरेपूड घालून जे ताक/मठ्ठा बनवते त्याला तोड नाही. शिवाय लहान मुलं असतील तर त्याच्यात थोडी साखर घातली तर मज्जाच मज्जा.
५ ऊस रस :- उन्हाळ्यात शरीरात पाणी आणि ग्लुकोजचे बॅलन्स असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. ऊसाच्या रसमुळे या दोघांचा योग्य समतोल शरीरात राहतो. लहान मुलांसाठी एनर्जी ड्रिंक म्हणून ऊसाचा रस फायदेशिर असतो.
https://businessthinkz.blogspot.com/2023/04/%20%20%2030000%20%20.html
"पण आज हि पेये दुर्लक्षित होऊ लागली आहेत. यांची बाजू आता विविध शीतपेये (मिरिंडा, कोकाकोला), वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सी, आईस्क्रीम आणि साठवलेले लिंबूपाणी वगैरे पदार्थ घेत आहेत."

Comments
Post a Comment